सुखी आयुष्य
सुखी आयुष्य
आंनदीत स्वतःला ठेऊन
हसत खेळतं रहायचं
काही दिवसाचं अस्तित्व
मनसोक्त आपण जगायचं
न दोष कोणाला द्यायचा
न त्रास करून घ्यायचा
प्रामाणिकपणा दागिना
निरंतर अंगी जपायचा
लहान असो वा मोठे
आपुलकीचा भाव रुजवायचा
वयाची बंधने तोडून,
गोडवा नात्यात वाढवायचा
सुखी आयुष्य आपलं
आपल्या हाताने घडवायचं
स्वार्थ बाजूला करत
हक्कासाठी मात्र लढायचं