रंग कोणता?
रंग कोणता?
प्रेम म्हणजे अंतरातील हासू
प्रेम म्हणजे विरहातील आसू
क्षणोक्षणी बदलत जातात रंग
प्रेम कधी सून तर कधी सासू......
प्रेम अमृतवेल आठणींची बाग
प्रेम दरवळ सुगंधी फुलांचा
स्वप्नवत सारी दुनिया प्रेमाची
प्रेम विषय सार्यांच्या आवडीचा....
प्रेम ओढ भावनांची, जाणिवेची
कधी प्रेम अंतरातील आहे घाव
प्रेमाचा रंग कोणता? सांगणे कठीण
जीवनाचाच की हो हा सारा डाव....
प्रेमात वेडावून जातात सारे
प्रेम हृदयाची आर्त साद
प्रीतवेड्या भावनांना गुंफतात
आसक्त हे आलिंगनी प्रमाद....

