रंग बरसे - प्रेमरंग
रंग बरसे - प्रेमरंग
निळ्या रंगाच्या निस्सीम भक्तीत,
सावळया रुपावर भाळले..
कृष्णसंगिनी मोहित होऊनी,
श्याम वर्णच्या अंतकरणास एकरूप झाली..
हिरव्या रंगाच्या मोरपंखी छटा,
मनी बांसुरीचे सुर छेडले..
कृष्णप्राणाधिका मन अधीर होऊनी,
मुरलीधरच्या मायेला पाझर देऊन गेली..
पिवळ्या रंगाच्या प्रकाशात,
सप्तरंगी प्रितीचे तरंग उठले..
कृष्णप्रेमवती मंत्रमुग्ध होऊनी,
मुरली मनोहरच्या भेटीस निघाली..
लाल रंगाच्या मोहपाशात,
नजरेने दोन जीवांना हेरले..
कृष्णप्रिया उत्साही होऊनी,
मनमोहनच्या देहावर रंगाची उधळण केली..
गुलाल रंगाच्या स्नेह संबंधात,
प्रेम परिभाषिक चित्र रंगले..
राधा बावरी आनंदात दंग होऊनी,
श्रीकृष्णाच्या जिव्हाळ्यात रंगपंचमी खेळुन गेली..

