रक्तरंजित प्रेम पत्र
रक्तरंजित प्रेम पत्र
सोडून गेली मजला तू
हरवला माझे छत्र
तेव्हा आठवते मला
तू लिहिलेले प्रेम पत्र
सांज वेळी भेटलो होतो
तेव्हाच झालो मित्र
आठवते का तुला
पहिले प्रेम पत्र
तेव्हाच लागला मजला
तुजसाठी झुरण्याचा छंद
झुरता झुरता झालो
खरच ग बेधुंद
प्रेमाच्या त्या सागरात
अखंड वाहत होतो
आपल्या लग्न विधीचे
चित्र रंगवत होतो
चित्रांच्या दुनियेत
किती गुंतलो होतो
साखर झोपेत पण
भेटत होतो
खेळत होतो आपण
प्रेमाचा डाव
काळाने का घातला
त्यावर घाव
आला होता एकदा
त्या सागराला पूर
का ग केल त्याने
तुझ्यापासून दूर
का ग तू मला
एकट्याला सोडलस
तुझ्या अंत्ययात्रेला
मला का बोलावलस
जाताना देखील
सर्व काही नेले
माझ्या साठी मात्र
आठवणींचे पत्र ठेवले
वाचतो तेव्हा तुझे
रक्तरंजित पत्र
रडून रडून सुजतात
माझे हे नेत्र
तुझ्या आठवणीत अजूनही
मन माझं खचते
रोज तुझे ते रक्तरंजित
प्रेमपत्र वाचावेसे वाटते - कोटस्थाने अक्षय
