तोच तो भाऊ असतो .....
तोच तो भाऊ असतो .....
जन्माला आल्यावरती
इजा होईल तिला असं
म्हणून हात मागे सारतो
तोच तो भाऊ असतो ...
स्वतः दोघांच्या दप्तराचे
भार उचलून तिला बोट
धरून शाळेत नेतो
तोच तो भाऊ असतो ...
अभ्यास करत असली
कि गपचूप जाऊन
तिची खोड काढतो
तोच तो भाऊ असतो ...
स्वतः कमी खर्चात शिकून
तिला मात्र
सुशिक्षित बनवतो
तोच तो भाऊ असतो ...
मी असताना तुझ्या केसांना
धक्का पण लागणार नाही
असे आश्वासन देतो
तोच तो भाऊ असतो ...
बाहेर जाताना कोणता
शर्ट घालू , कसा दिसतो
असं विचारून वेष करतो
तोच तो भाऊ असतो ...
लग्नाला आल्यावर ती चालली
एकदाची आता सगळं माझाच
असं म्हणून चिडवत असतो
तोच तो भाऊ असतो ...
सासरी तिला निघताना
अश्रू आवरून डोळ्यातले
तिच्यासमोर मात्र हसतो
तोच तो भाऊ असतो
आई -वडिलांनंतर
एका मुलीला
हक्काचं माहेर देतो
तोच तो भाऊ असतो
