निसर्ग शृंगार
निसर्ग शृंगार
1 min
12.1K
निसर्ग शृंगार
देवाचे हे दान,
मोहक दृष्याने
हरवते भान॥१॥
झाडे, वृक्षवेली
शेत नि शिवार,
पक्ष्यांचा संसार
दिसे झाडांवर ॥२॥
नवी नवी इथे
प्रेमळशी नाती,
ऊब देते मज
गावातली माती॥३॥
गंध ममतेचा
वसे दाही दिशा,
पहाट रोजची
देते नवी आशा॥४॥
हिरवा तो साज
ल्याली माझी माय,
नाही सांगणार
कुणी तिचं वय॥५॥
निसर्ग शृंगार
देवाचं गं देणं,
आम्हा लाभलेलं
खूप मोठं लेणं॥६॥
