STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

रक्तदान...!

रक्तदान...!

1 min
525

जागतिक रक्तदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!


देणं हा शब्दच

जिव्हारी लागतो

आजवरच्या संस्कारित

जीवाचं ऋण भासतो....


घेणाऱ्याने देणाऱ्याचे

हात घ्यावे

हेच जणू विसरून जावे

मग कसे

जीवनाचे गाडे चालावे...?


देण्याचा आंनद

घेणाऱ्याने

एकदा तरी अनुभवून पहावे

घेता घेता

कधीतरी देऊन 

देण्याचे सौख्य घेऊन पहावे...


रक्तदान दिनाच्या

शुभेच्छा देताना वाटते

काहीच जमले नाहीं तरी

देण्याच्या भावनेची निदान

अनुभूती तरी घेऊन पहावे...


शुभेच्छा देऊन

रक्तदानाची भावना

मनामनात म्हंटले पेरून पहावे...

शुद्ध बिजा पोटी

म्हणतात तसेच घडेल

रक्तदानासाठी किमान

एकतरी पाऊल बाहेर पडेल...!


रक्तदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational