STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

रक्षा करूया भारतमातेचे

रक्षा करूया भारतमातेचे

1 min
215

भारतवासी आम्ही सारे

एक धरती एक वतन

हातात - हात घालूनी

हृदयास - हृदय जोडून ||


कोणी पंजाबी तर गुजराती

वेगवेगळे धर्म आमुचे

 रक्त सर्वांचे आहे सारखे

 पुत्र आम्ही कर्मभूमीचे ||


कोणी मुस्लिम तर मराठा

बालक आहोत या भूमीचे

 उंच उंच डोलवू तिरंगा

रक्षा करूया या मातेचे ||


कोणी बंगाली तर तमिळ

देशी-विदेशी एकत्र राहती

सगळ्यांनाच इथे सहारा

मिळून मिसळून सर्व राहती ||


आम्हीच आहोत भाग्यविधाते

या देशात जन्म घेऊनी

नाही थारा भ्रष्टाचाराला

विकास घडवू एक होऊनी ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational