STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy

रिते आंगण

रिते आंगण

1 min
181

चालू काळात नातं कस संपल नाही उमजत 

वाढत चालला दुरावा कसा हे नाही समजत


आजीआजोबा काका, मावशी, मामा 

नव्या पिढीचा समज, नाही कोणी येत कामा 


विश्व त्यांचे मित्रमैत्रिणी, यात होतात मशगुल 

दिसलं कोणी नात्याचे, हाय हॅलो म्हणून चटकन होतात गुल 


पूर्वी असायची कुणा एकाकडं गाडी 

आजोळी घेउन जायचा संपूर्ण वाडी

 

आता मात्र एकटेच जातात कुठेही,

नाही लागू देत सुगावाही 


फोटो सेल्फी काढून दाखवता पुरावा 

उसना आनंद आपण मानावा 


न सांगता खरेदी असते मोठी 

विचारले तर अरे सरप्राईज, खोटे हास्य ओठी


चांगल्या कार्यक्रमाला ठराविक नातलग हजर 

जास्त कोणी नको म्हणता, चुकवतात नजर 


पारखे झालो क्षणिक सुखाला

निमंत्रण मात्र हक्काचे दुःखाला 


देखल्या देवाला घालतात लोटांगण 

दुरावत चालले आहे नात्यांचे आंगण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy