रिक्त होताना जीवन
रिक्त होताना जीवन
ओळखीचा सुर का कंपित भासे
भावनेचा पुर ओंजळीत का वाहे
रोजचाच दिवस आज मरणासम भासे
भास नव्हते ते मनिचे शब्द खरे जाहले
आज जाणले गरज नसते कोणाची कोणा
उगाचच फसतात लोक नात्यांच्या वेरूला
जन्म घेणार तो मारणार ,जगणार कस ..
इथे कधी कोण नसत पुसत तरी का
या जन्माचा त्या जन्माशी नात गुंफ्तो
शब्दाचा शब्दाशी भाव बंध जसा जोडतो..
इथे कुठच नाही माझा गाव असा भास उरतो
खरे कितीही वागा खोट्यास मान्यता इथे
जन्म मृत्यू पेक्षा जगण्यास मान्यता इथे
श्वास आपले तरी का इतरांसाठी जगतो
जगताना तरी ते निस्वार्थी / स्वार्थ प्रश्न उरतो
काय पाहीजे जे शब्द फुका मी वाहिले
बोलक्या नजरेत आज प्रश्न उगा न राहिले
अशाच काहीशा होत्या बहरलेल्या बागा फुलंचया
नजरेत कोरड्या जाहल्या जीवनाला मुक्ल्या
अशा न अशा का भावते ती मज कोरडी नदी
तहानलेल्या जीवास ही भोवते दु:ख केव्हढी
सोसवेना मला ही या कळा कुणा जिवाच्या
आज जाणिले होते अनोळखी जाणिवा त्या
होते नव्हते सारे वाहिले मी चरणी तुझ्या
माझे नव्हते ते निखारे परी पदरी सांभळीले का
नशिबात नव्हे ते फळ कर्मास फुका दोष देतं
नीयतीचे लेखी नशीबास कर्माचे गित गायीले
दिला जन्म विधात्याने लोकानी नशीब लिहीले
सरळ मार्गी होती एक विमल्ंन्भुजा होती
दैवत्वाची विभूती फास नियतीने आवळला
ओळखी न ज्वालामुखी परी प्रश्ननी घाव केला
मानवाच्या या यातना त्या मानवा न उमगलया
दुखरे कोरडे आसवांचे झरे भावले ना कुणाला
कधी काळी होती याच बागेची ती एक कळी
फुलली बहरली बाग ती फुले आज कोमेजली
भावनेचा जपला निखारा श्ब्दानी तो घात केला
प्रश्न जगण्याचा होता संशया स तो ही न खपला
काळजातले बोल आता खरे मुके जाहले
जुन्या त्या वाटेला धूळ पायस लागली
इतकी प्रसंगा तुनी मी उभीकाळ न्याय करेल ही
प्रश्न आजचा तो भविष्य का ते अंधारला
परी शब्द नव्हते सोबतीला भाव नव्हते साथीला
काळा पुढे न्याय मुर्ती ती आंधळी दिसली मला
हाच तो न्याय का विश्वास डोळ्या दखले खोटा
कान ऐकले पुरव्यात सिद्ध जाहले खरे खोटे
चरित्र कोणते दाखले देवू पाहती उगाच
कोणते फसवे तराणे भुलती का हे पाखरे
दुर राहिली बघ आज आपल्या घराची वाट रे...
आज वर जी ही खोटी ओळख ना जपली
खरया संगती आज खोटे ही अंगीकारले
प्रश्न कानी पडतच नव्हता होता तो फक्त राग
अशी कशी काज निखर्यात वास्तव्य जपत गेले
विश्वासाचा बेड्या तिनेच तर आवळलया
अविश्वासत तिला त्या ही परक्या जाणवल्या
अपेक्षाच ओझं इतक का जड झाल..
आचानक सारे पाश हे रिक्त भासू लागले
कळले होते जे पाश कोरड्या नात्यातला गिलवा
पडल्या होत्या त्या भिंती मायेच्या रिक्त भावना
न्याय मागता जगास जगण कठोर वाटेना
परकी होती तरी छळ जगाचा सोसला
न्याय कोणाला मागता नशीबाने घाला केला
शब्द अपुलकीचे चरित्र्चे न्याय बोलतात.
अन्यायाची भाषा उगाच दोष जन्मा लावतात
तिच असणं तिच नसण काहिच मोजता नसत
कोडं तुझ्या मनिच नाही मोठ प्रश्न अस्तिवा पडावा
आत्म्यास कलंक लावुनी समज तो ही खोटा ठरला
होतेच आपले सगळे तरी असे परके का वागती
खोटे होते का नाते तरी अवाजवी हक्क का दावती
अमृताचे कण त्यावर विशचे प्रहार जाहला
विशमृत घेता मुखी तरी अंतास कारण ना ठरला
असा तिचा असणं ही नसण्यास कारण ठरल
भाव भावनेचा कुंचला हा रिकामा घट कस,ठरला
आयुष्याची सुर्वात ती शेवटास शीण ठरली
भोग कालचेच तरी भविष्यात का नशीब लिहिति
प्रश्न माझेच मला असे का नेहमी छळती
उत्तरंस ही नसे अधिकार मग निरुत्तर का हे सारेच
नको उत्तर मला न्याय ही नको आता जन्म मरणाच
तो फेरही जाहला फुकाचा असा
नको जगण नको जग तुझ ते
विखुरलया नात्यात आता नको पुन्हा गुंतने ते..
जरा जरा मोकळे जीवन आता कुठे रिक्त होते...जीवन
