STORYMIRROR

Sharad Kawathekar

Romance Others

4  

Sharad Kawathekar

Romance Others

रिकामी ओंजळ

रिकामी ओंजळ

1 min
514

ती भेटली

स्वप्नातल्या एका 

आडमुठ्या वळणावर 

झाडाला टेकून उभी होती 

शून्यात नजर लावून 

शून्याकडेच पाहत होती 

समोर मावळतीचा सूर्य होता 

लालभडक रंगही त्या 

क्षितिजाला लाजवत होते 

मध्येच एखादा काळा ढग 

तुझ्या उडणाऱ्या ओढणीत

उगीचच अडकत होता 

आकाशातली एखादी चुकार चांदणी

तुला अलगद स्पर्श करत होती 

आणि त्या स्पर्शाचे भावतरंग

चेहऱ्यावर दिसत होते 


आणि तू....

विस्कटलेल्या त्या क्षणांना आवरत होतीस

आणि मी

क्षणभर ओशाळलो

गंधाळलो

दरवळलोदेखील 

भरल्या डोळ्यांनी ते क्षण

ओंजळीत भरून घेत होतो 


भानावर आलो...

तेव्हा रिकामी ओंजळ होती 

सूर्य मावळला होता 

आणि क्षितिजही अंधारात हरवलं होतं 

आणि मी चक्क झालो होतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance