STORYMIRROR

Ajay Nannar

Romance

4  

Ajay Nannar

Romance

रीत प्रितीची

रीत प्रितीची

1 min
387

रंग गारव्याचा गुलाबी

उधळतो सभोवार,

उधाण आसमंतात

रंग प्रेमाचा शराबी

बहरतो दोहोंत

अल्लडशा एकांतात...


कातरवेळीच्या रंगात

क्षितीज धुंद रंगून जाते...

रीत प्रितीची नभास

भेट आपली सांगून जाते...


अलगद अशी रात्र

क्षितिजावर उतरते,

तुझ्या आठवणींची वेल

मना मग बिलगते...


मोहक स्मित मधुर

आेठी तुझ्या उमटते...

जसे गर्द काळ्या लाटांवर

शुभ्र चांदणे विसावते...

दरवळतेस स्वप्नात

धुंद जशी रातराणी,

वेचत ती स्वप्नसुमने

रात्र माझी जागी

रुप तुझे स्मरता

नभी चांदणे सजते

चांद हसरा येतो,

अन आसमंतही नटते...

येशील का तू सांग एकदा

तुजविण जगणे अधुर वाटे


जगणे अधुर वाटे...


सखे,

हातात हात घेशील जेव्हा,

भिती तुला कशाचीच नसेल

अंधारातला काजवाही तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर असेल...

सूर्य मावळतीला जातो

अन खिडकीतून अलवार डोकावते

एक लकेर,


तुझी आठवणही हळूवार तशीच येते,

सरणाऱ्या प्रत्येक त्या दिवसाअखेर...


मनाच्या वहीत जपलंय

तुझ्या प्रेमाचं एक पान


निर्भेळ प्रेम माझं

डोळ्यांतून तू जाण...


तुजविण सख्यारे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance