रहस्य
रहस्य
काय झाले असे अचानक
हात माझे रक्ताने बरबटले
कुणी कुणाचा वध करून
असेच टाकुन पळून गेले
भूत प्रेत की कोणी मृतात्मा
दिसे रात्री शुभ्रधवल वेशात
काय अघटित घडले तिथे
रक्ताळले हात घालता खिशात
नवल परी घडली कुणा न ठावे
समजले नाही मज आज वरी
पिशाच्चबाधा की भानामती
स्वच्छंद जीवन फुलपाखरापरी
धावा करतो तुला परमेशा
तारून ने तु मजला यातून
घडीभराचंअनमोल जीवन
सरेल कसे बंदिवासातून
कोणी केली काळी जादू
अंगलट ती माझ्या आली
रात्री परतता कामावरून
माझ्या जीवनी ती घडली
