रेशीम गाठ
रेशीम गाठ
बेधुंद वाहू लागणारा
मदनाचा वारा सुटला की
आकाशी काळे-निळे
ढग जमून येती......!
रिमझिम सरींचा
वर्षाव सुरू होतो
आणि प्रेमवीरांच्या मनात
रोमान्स बहरून येतो......!
पावसाच्या सरी आपणास
दूरवर कोसळताना भासतो
आणि मातीचा मधुर सुगंध
सर्वत्र दरवळलेला जाणवतो......!
रिमझिम पावसाचे थेंब
"मार्शल" अंगावरती झेलताना
प्रियकर-प्रेयसी लगेचच
रेशीम गाठ बांधून घेतात......!

