STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

रेशीम बंध

रेशीम बंध

1 min
429

या रेशीम बंधात बंदिस्त

दोघे आपण प्रणयीजीव

मी तुझ्यात न् तू माझ्यात

होऊ मिसळूनी एकजीव

प्रेमाच्या या रेशीमगाठी

गुंफल्यात दोघांत प्रेमाने

फुलवून संसार सुखाचा

कमवूया धन श्रमघामाने

तुझ्या गुलाबी गालांवरती

सखी फुलले लाल कुसुम

सौंदर्य पाहूनी मी विस्मित

वाटते चुंबावे हे कपोलसुम

गंधाळल्या वाटा चहूबाजू

तुझ्याच सखी गं आगमाने

प्रीतीत धुंद होऊनी साऱ्या

मिसळल्या एकत्र संगमाने

ओढ अनावर ही लागली

सखी तुझ्याच मिलनाची

घट्ट मिठीत घेऊनी तुजला

लाल अधर तव चुंबनाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance