रातराणी
रातराणी
अंगणात बघं ती रातराणी आजं
कशी खुलून दिसतेयं ना??
ही नीरव काळोखी रात्र आणि
ही श्वेत रंगात ताठं मानेने
उभी असलेली ही रातराणी
किती मनमोहक!
हिची ओढं चं जगावेगळी असते.
त्या कस्तुरी मृगासारखी
सुगंधाची एक गुढ कुपी आहे या रातराणीकडे.
ही अख्खी रात्र त्या गंधात दरवळतं आहे
आणि मी हा अंगणभर पसरलेला सुवास
मनाच्या ओंजळीत वेचण्याचा
एक वेडा प्रयत्न करतं आहे.
खरतरं हे असे वेडे प्रयत्न करतोयं
हे माहितं असते आपल्याला
तरीही हा वेडेपणा करतोचं आपण कधीतरी
कारण हा असा वेडेपणा
रोज रोज करावासा वाटतं नाही.
कधीतरी चं अशी एखादी रात्र गवसते
नजरेतं साठवण्यासासारखी..
कधीतरी चं ही रातराणी ही इतकी बहरते
की चंद्राला ही तिच्या श्वेतपणाचा हेवा वाटू लागतो.
आणि तिच्या सुंगधा च्या ओढीने
कधीतरी एखादा तारा ही
आकाशातून निखळून पडतो
