STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Romance

3  

Surekha Chikhalkar

Romance

रातराणी

रातराणी

1 min
428

फुलते रातराणी जशी

   रातीची चाहूल झाली

होऊन बेभान नजर 

   तुला शोधत राही...

अलवार तुझी चाहूल

उन्मत प्रेमाचा रंग गाली

वळवाच्या पावसाला जाग आली

बरसण्यात सारी रात गेली

फुलते रातराणी जशी 

रातीची चाहूल झाली...

तापलेली धरणी पुन्हा

  कवेत भिजून गेली

झोकून स्वतला

  प्रेमामध्ये रुजून गेली

फुलते रातराणी जशी 

  रातीची चाहूल झाली...

माहित नाही प्रेमाचा

   अर्थ असे काही

जिथे राधा तिथे शाम राही

   हृदय जिथे साद घाली

तिथे प्रेमाचा गाव होई

मनाच्या संवादाला 

 प्रतिसादाची दाद आली

फुलते रातराणी जशी

  रातीची चाहूल झाली

होऊन बेभान नजर

   तुला रे शोधत राही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance