STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

रामनवमी

रामनवमी

1 min
205

रामनवमी

जन्म तुझा आज

चढविते साज

प्रार्थनेत मी ...


हे प्रभू रामा

दया भक्तावरी

कृपा दृष्टी धरी

हे नीजधामा ...


नसे देशात

तुझे राज्य आज

पैशाचा तो माज

 सर्व जगात ...


ठाण मांडून

कोरोना बसला

भक्तीचा मांडला

कर जोडून


संकट ठावे

भयभीततेचे

त्या नैतिकतेचे

दर्शन व्हावे ...


कलीयुग जावे

संकट सरावे

राम राज्य यावे

हे मनोभावे ...


तुझ्या सारखा

राजा नसे कोणी

भाकर व लोणी

तो राम सखा ...


हीच प्रार्थना

तुज मनोभावे

मनात असावे

नाम साधना ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational