रामायण
रामायण
मी ऐकलंय
त्याने रामायण लिहले घडण्याआधीच
लोकं म्हणतात,
त्याआधी तो वाल्या होता..
अनुभूती अथवा अनुभवातून घडला
अनुभव हाच त्याचा गुरु होता..!!
मग कोण असावा नारद?
ज्याने पहिली ठिणगी पेटवली
कळलाव्या की गुरु?
त्याच्याच किमयेने वाल्या भस्मसात झाला
अन् वाल्मिकीला नवी दिशा मिळाली..!!
कपोल काल्पीत वाटेल तुम्हास
पण तेच खरे द्रष्टे असावेत
कारण सत्य हेच आहे
रामायण आजही घडते आहे
फरक मात्र इतकाचं आहे
आता ते नारद घडवतोय
तेव्हा तो एक होता, आता बरेच आहेत
आणि त्यांच्याच कृपेने
वाल्मिकीचं पुन्हा वाल्यात रूपांतर होतंय..!!
