STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

1 min
249

लखुजी जाधवांची सुकन्या

शिवछत्रपतींची वीर आई

शहाजी राजांचे भार्या

होत्या राष्ट्रमाता जिजाई ||


तोडुनी माहेरचे संबंध

पतीशी होत्या एकनिष्ठ

नात्यांना बाजूला सारून

आपल्या कर्तव्यात ध्येयनिष्ठ ||


स्वराज्य रक्षकाला देऊनी जन्म

लहानपणीच बाळकडू पाजिले

जिजाऊचे स्वराज्यात योगदान

उत्तम संस्कार शिवावर बिंबविले ||


लहान वयातच शिवबाला सांगे

जीवघेण्या प्रसंगातील गाथा

दूरदृष्टी, न्यायभाव, सहिष्णुता

सर्वगुणसंपन्न होत्या राजमाता ||


शिवरायांचा राज्यभिषेक करून

विलक्षण सोहळा घडवून

छत्रपती बनल्याचा आनंद घेऊन

बारा दिवसांनी त्या गेल्या सोडून ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational