STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4.3  

UMA PATIL

Inspirational

राजकारण

राजकारण

1 min
34.5K



श्रीमंतांचे बनतात बंगले

गरीब राहतो झोपडीत

पुढारी करतात पक्षांतर

एकातून दुसऱ्या उडीत


नेत्यांना सत्तेची लालसा

सतावते खुर्चीची हाव

जनता म्हणते परमेश्वराला

देवा मला आता तरी पाव


एकमेकांवर फेकून बाॅम्ब

नेत्यांची सुरू झाली दिवाळी

मोठा पक्ष, मोठी खुर्ची

जुन्यालाच चढू लागे नव्हाळी


सत्ता बदलाची आतिषबाजी

पक्षा-पक्षांचा झाला चिवडा

अच्छे दिन म्हणजे प्रजा 'दीन'

तरी म्हणतात आम्हांलाच निवडा


धनुष्य, कमळ, पंजा, हत्ती

जितके पक्ष, तितके चिन्हं

भगवा, निळा, हिरवा, पांढरा

रंगांच्या दुनियेत सामान्य सुन्नं


पुढाऱ्यांचे नवे - नवे थाट

प्रत्येकाचा न्याराच ढंग

पांढरी खादी वापरून सुद्धा

सरड्यासारखे बदलती रंग


राजकारणाला म्हणती दलदल

तरी कोणी करेना साफ

पैसे देवून निवडून येती

कसे करावे यांना माफ ?


राजकारणात पडून तरूणांनो

थांबवा आता भ्रष्टाचार

टेबलाखालून देणे - घेणे नको

येऊ द्या भारतात शिष्टाचार


शहाणा असशील जर तू

राजकारणात पडू नको भाऊ

इथे नाही कोणी कोणाचे

आहेत सर्व नेते ऐतखाऊ


सामान्य गेला भरडून

जनता गेली करपून

या राजकारणाच्या आगीत

भारत गेला होरपळून



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational