STORYMIRROR

Rahul Salunke

Romance

4  

Rahul Salunke

Romance

राहुल तुला काही सांगायचय..

राहुल तुला काही सांगायचय..

1 min
509

राहुल तुला एक सांगू का?

देह माझा हळद तुझ्या नावाची

हात माझा मेहंदी तुझ्या नावाची

भांग माझा सिंधुर तुझ्या नावाच.

गळा माझा मंगळसूत्र तूझ्या नावाच.

माझं थोडं ऐकशील का?


माझ्यासाठी थोडा बदलशील का?

माझ्या मनाचा थोडातरी

विचार करशीन का?

मला जिवापाड जपशील का?


सकाळी सकाळी चहा मला देशील का?

वाफाळता गरम उपमा नाश्त्याला देशील का?

भाजीत मीठ नसेल तरी मन मारून घेशील का?

प्रेमाचे दोन शब्द स्तुती करशील का?

साडी मस्त शोभतेय दाद देशील का?


सुट्टीत मला फिरायला नेशील का?

लहान मुलगी समजून हट्ट पूर्ण करशील का?

वाढदिवस नसतांना गिफ़्ट देशील का?


झोपतांना आधाराची कुशी दे.

जमलेच तर सुरात स्वप्नांची मोकळीक दे.

पुरुषप्रधान संस्कृती सोडून...

माणुसपणाला थारा दे.

मला जगण्याला सहारा तुझा सहारा दे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance