STORYMIRROR

Rahul Salunke

Others

3  

Rahul Salunke

Others

झाडांवर प्रेम करा मनापासून..🌴

झाडांवर प्रेम करा मनापासून..🌴

1 min
352

माणसं ही सावल्यांवर प्रेम करत नाही..

फांद्यांवर करतात..कारण ते देतात..

सावली, फुले, फळे, जगायला हवा.

किती स्वार्थी माणूस हा?


माणसं त्याला गोंजारत असतात..

लहानच मोठं करत असतात.

फक्त आणि फक्त खोट्या प्रेमाच..

नाटक करत असतात.


झाडांना ठाऊक नसते असे नाही.

पण झाड माणसाच्या खोट्या प्रेम,

मायेसाठी नाही तर...सावली देण्याचा

ऊन, वारा, पाऊस झेलण्याचा...

धर्मासाठी उभे असतात.


झाड एक जागेवर उभे...

म्हणून ते परंपरावादी.

माणसे जागा बदलतात

आपापसात वादविवाद करतात.


माणसं मागून घेतात स्वातंत्र्य..

सैराचारच्या नावाखाली..

पालख्या मिरवत नेतात.

झाडाला मात्र ते स्वातंत्र्य नसते.

ते वादळात एकजागी खंबीर उभे असते.


प्रसंगी वादळात मरून पडण्याचे..

अंगावर वीज झेलण्याचे....

सामर्थ्य त्याच्यात असते..

असे माझे हे परोपकारी झाड असते.



Rate this content
Log in