मी एक प्रणयप्रेमी..💋💋💋
मी एक प्रणयप्रेमी..💋💋💋
1 min
109
लग्नानंतरची ती पहिली रात..
श्वासात गुंतले श्वास
हातात गुंफले हात
उबदारश्या तुझ्या मिठीत
अजून आठवते ती रात.
बिलगलो तुला सजनी..
तुझ्या स्पर्शाने नाहली रात.
माधुर्य तुझ्या ओठांचे ते.
अर्पित राहिली ती रात.
केव्हा कधी न कळले..
मिटले थकून डोळे..
एका फुलपाकळीला.
फुलवून संपली ती रात.
