प्याला
प्याला
गंध माझा दिला मी फुलाला
घात माझा सुगंधात झाला
नेम लावून साकी निघाली
लागला बाण तो काळजाला
अमृताचा उभा कुंभ प्रीती
ओठ होते विषाचाच प्याला
तू कटाक्षात एकाच केवळ
जीव खल्लास केलास बाला
मोगऱ्याने असा घाव केला
रक्त कोठे दिसेना जगाला
गंध माझा दिला मी फुलाला
घात माझा सुगंधात झाला
नेम लावून साकी निघाली
लागला बाण तो काळजाला
अमृताचा उभा कुंभ प्रीती
ओठ होते विषाचाच प्याला
तू कटाक्षात एकाच केवळ
जीव खल्लास केलास बाला
मोगऱ्याने असा घाव केला
रक्त कोठे दिसेना जगाला