STORYMIRROR

siddheshwar patankar

Romance Tragedy

4  

siddheshwar patankar

Romance Tragedy

पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे

पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे

1 min
212

पूर्वी आपण जिथे भेटायचो


तिथे आता एक टपरी झालीय


एक तपानंतर पुन्हा कप घेतला


पण कटिंग इथली बरी झालीय


वळणे घेत घेत तू तिथून तर मी कुठून कुठून यायचो....


कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोंड लपवायचो


मी घाबरून तुलाच म्हणायचो हळहळू डेरिंग बरी झालीय


त्या झाडामागे बराच इतिहास घडला


तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा


पण नंतर तुटलो ते कायमचेच जणू भेटलोच नव्हतो...


आज इथे आलो तेव्हा साठी माझी पुरी झालीय


असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत


मीही व्यग्र माझ्या जीवनात


तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती


ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance