STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational

3  

vaishali vartak

Classics Inspirational

पुस्तक माझा सखा

पुस्तक माझा सखा

1 min
243

वेळ मजेत जायला

हवा एक सवंगडी

देई मनाला उभारी 

असे जो मन कवडी


पाहताच तया मनी

आनंदाचा पार नसे

खरा जीवलग मित्र 

 याची ग्वाही देत असे


येता कठीण प्रसंग

 सख्यासम उभा पाठी

 संयमाचा दावी मार्ग 

 हवा तो आधारासाठी


असा असे एकमेव 

मित्र माझा तो पुस्तक

भरलेला जो ज्ञानाने

भेटीसाठी मी उत्सुक 


खरा तो मार्गदर्शक 

पहा ज्ञानाचा सागर

नसे उणीव ज्ञानात

घ्यावी भरुन घागर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics