पुस्तक आयुष्याचे
पुस्तक आयुष्याचे
आयुष्याच्या पुस्तकात
पाने रोज पलटतात
निर्णय घेतलेले कधी
आपल्यावरच उलटतात।।
विविध रंगी मुखपृष्ट
असते उत्तम सजलेले
वरून दिसते आलबेल
आतून असते खचलेले।।
आयुष्याच्या पानांना
द्यावा लागतो आकार
सुखदुःखाच्या धडयाचें
अनेक असतात प्रकार।।
आयुष्याच्या पुस्तकाचे
आपणच असतो नायक
तावुन सुलाखुन निघणारे
असतात त्यासाठी लायक।।
पुस्तकाचा काही ना काही
करावा लागतोच ना अंत
आयुष्याच्या उत्तरार्धात
ना खेद असावा ना खंत।।
