STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

4  

Sushama Gangulwar

Romance

पत्र

पत्र

1 min
325

तुझ्या प्रेमात मी 

तुला लिहले पत्र 

तुझ्या उत्तरासाठी 

टवकारले माझे नेत्र 


पत्रात मी माझी 

प्रीत केले व्यक्त 

तुला वाचताना अक्षरात 

दिसले का रे माझे रक्त 


माझ्या पत्रात मी 

कळवल्या माझ्या भावना 

तू ही माझ्यासाठी 

एक प्रेमाच पत्र लिह ना 


तुझ्याविना मला 

एक क्षणही रहावे ना 

तुझ्या पत्रातून तू 

मला येऊन भेट ना


तुझ्या मनातले काही 

भेद तूही खोल ना 

तुझ्या पत्रातून मला 

तू काहीतरी बोल ना 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance