STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

2  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

प्रवास अन् प्रवासी...

प्रवास अन् प्रवासी...

1 min
65

प्रवास हा रोजचाच

नाही फुरसत श्वास ही घ्याया

जीवघेणी ही ओढाताण

गरज की स्वतःशीच चढाओढ...

पण कशीच नाही मोडत

माणसाची हव्यासी खोड...

नित्याचाच प्रवास पण

आस नाही एकमेकांस...

तू-तुझे अन् मी-माझे 

इतुकेच पुरले आयुष्यास...

जायचे नाही कुठेच

पण रोजचे हे हेलपाटे...

कधी होईल सारे सुरळीत

उगीच मनाला वाटे...

जगणे अवघड की

मरणे सोप्पे...

हा प्रश्न का पडावा...?

सगळे जाणून ही...

मोह न आवरावा...

प्रवास हा जन्म-मरणाचा

चालूच करत आहे...

आपण त्यातले फक्त एक प्रवासी

नाही कायमचे निवासी

हे प्रत्येकाने आवर्जुन जाणणे

अन् आपला प्रवास सुखकर करणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy