STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Classics Inspirational

प्रश्न मनासी

प्रश्न मनासी

1 min
673

क्षणाचे भास ही खरे होतील कधी

रिते मन इतके अधिर कशासाठी

तेज सूर्याचे लेउनी किरणे येती

साक्ष तयांची मागते कुणासाठी


पावलो पावली तया खुणावती

ओळखीच्या खुणा कशासाठी

आजकाल एकटी वाटते सांज ती

क्षितिजामनी काळजी कुणासाठी


प्रश्नास उत्तर मिळेना का अंती

नियमात फेरफार तो कशासाठी

नशिबाची रेखा उजळते अशी की

ऋणांकित मन झुरते कशासाठी..


काळजातली सल ती विचारती

सांग न जगते ते ही कुणासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy