STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Others

4  

Pandit Warade

Tragedy Others

प्रमाद

प्रमाद

1 min
403

वेदना त्याने दिलेली मजला प्रसाद आहे

प्रेम ते कळलेच नाही हा माझा प्रमाद आहे ।।१।।


माय,बाप,बंधू,गुरू मज साठीच कष्टले

विसरलो उपकार त्यांचे हा माझा प्रमाद आहे ।।२।।


खेळलो, हुंदडलो, वाढलो छायेत ज्यांच्या

पारखे त्यांनाच केले हा माझा प्रमाद आहे ।।३।।


प्रतिक्षेत माझ्या तिने गाळले अश्रू किती?

कोरडा मी राहिलो हा माझा प्रमाद आहे ।।४।।


सोडले माझ्याच साठी माय, बाप घरदारही

सौख्य तिला नसे इथे हा माझा प्रमाद आहे ।।५।।


कोण झिजले मजलागी एवढा मी जाहलो

ते मला कळलेच नाही हा माझा प्रमाद आहे ।।६।।


आयुष्य हे माझे असेतो जो मला सांभाळतो

कृतज्ञता त्याची ऊरी ना हा माझा प्रमाद आहे ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy