STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

प्रलयंकारी पाऊस

प्रलयंकारी पाऊस

1 min
465

एकदा आलास तेच 

रौद्र प्रलयंकारी

मनापुढे सारखेच

भयंकर काहीतरी   (1)


पै पै जमवून आम्ही

छोटं खोपटं बांधलं

शून्यातुन निर्मिलेलं

पाण्यात वाहून गेलं   (2)


क्षणभर हबकले

एकदम सावरले

पिल्ले माझी बिलगली

मालकही भेदरले    (3)


नारीच असते दुर्गा

धैर्यशाली संकटात

पदर खोचला मीच

धीरोदात्त प्रसंगात    (4)


मोडला जरी संसार

हताश होऊ नकोस

अरे प्रलया विनाशी

तू पुन्हा येऊ नकोस   (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy