पर्जन्य वृष्टी
पर्जन्य वृष्टी
पहिल्या पावसाची रिमझिम सर
मनाला आला हिरवा बहर
दरवळला तो मातीचा सुगंध घ्यावा भरून
चिंब पावसात भिजण्यास यावे घरातून
शहारा आणणारा तो पाऊस
चिंब भिजण्याची पुरवितो हौस
रुसवेफुगवे जातात विसरुन
नकळत पावसात येतात हातात हात धरुन
नियतीचा हा खेळ
क्षणात येते नव्याने वेळ
थुईथुई लागले मोरही नाचू
मनाच्या अंगणात विखुरले पाचू
इंद्रधनुष्य ते दिसू लागले नभी
प्रियकराच्या भेटीला आतुर झाली,
चिंब पावसात भिजली उभी॥

