प्रियसी
प्रियसी
भुईवर आकाश निळे,
आकाशी चंद्र तारे,
सागरी लाट बरी,
चल जाऊ समुद्र किनारी.
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
नयन किती शुभ्र तुझे,
आत गोल गोल भिंगे,
नकोत काजळाचे पटे,
नको फ्रेम कानी
नको वेणीस गजरे,
फांदीवर ते बरे.
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
हात चालते, पाय चालते,
नकोत हात जोडलेले,
कर्तव्याचे दान बरे.
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
नको ज्ञान ते बोलके,
कर्तव्याशी पाठ लावते,
हात चाले पुढे पुढे,
हेच नम्रतेचे धडे.
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
माथी पदर दिसे,
भाळी कुंकू मोठे,
हवे हवे तुझे लेणे,
नको परीचे उदर उघडे,
नको नृत्य वेडेवाकडे,
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
हात तुझे चालते,
पाय तुझे पळते,
दूर ते दवाखाने,
आरोग्य तुझे बोलके,
अशी तू माझी पुतुळा,
नको त्या रंभा अप्सरा,
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.
भुईवर आकाश निळे,
आकाशी चंद्र तारे,
माझ्याशी तू बरी,
देतेस गरम पोळी.

