प्रिय सखी तेजेश्वरी
प्रिय सखी तेजेश्वरी
प्रिय सखी तेजेश्वरी
आली तू माझ्या जीवनी |
भार्या मिळाली मजला
हर्ष झाला माझ्या मनी ||१||
बंध रेशीम गाठाचा
धरुनिया हाती हात
सप्तपदी पूर्ण केले
स्वप्न पुढील पहात ||२||
प्रित झऱ्यात अमुची
जोड़ी बनली मित्राची |
माझ्या नावाने घातली
माळ मंगळसूत्राची ||३||
वट सावित्रीच्या दिनी
छान नटली सजून |
साड़ी माझ्या आवडीची
आज आहेस नेसून ||४||
सौभाग्याचं लेणं ठेवी
कुंकू लावुनिया भाळी |
साताजन्मी भेटण्यास
वट वृक्षाला ओवाळी ||५||
वट पौर्णिमेला आज
वृक्ष मिळूनी लावुया |
सत्यवान नि सावित्री
मग वृक्षात पाहुया ||६||
रक्षा पर्यावरणाची
करु दोघे कृपाठायी |
वटवृक्ष देई सदा
हवा शुद्ध प्राणदायी ||७||
