प्रिय चहा
प्रिय चहा
थकलेल्या मनाला उभारी देतोस,
कधी म्हटलं नाही मी ,
दिवसातील दोन वेळा ,
दिवसभर पुरतील,
ऐवढी उर्जा भरतोस ,
म्हणुन आज ठरवलयं ,
प्रिय चहा तुझ्याविषयी ,
थोडसं सांगावेसे वाटते,
नाही तु आहेस घातकच,
पण थोडासा घात ,
करून घ्यावासा वाटतो ,
कळते पण वळत नाही बघ,
तुझे दोन घुट ,
घुटात संजीवनी भरतोस,
आक्षेपार्हच आहे हे विधान,
पण माणसा ,
तु विषाचीच परीक्षा पाहतोस,
माफ करा मला पण
हा दूधाने भरलेला ,
साखरेचा गोडवा ,
बदामी रंगाचा कडकपणा,
हवा हवासा वाटतो ,
प्रिय चहा नक्कीच ,
तु कौतुकास पात्र ठरतोस...
