प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी


प्रीत तुझी माझी चैत्र बहर भवती वसुंधरा पालवली सृष्टी हिरवी हिरवी साज हरित नेसली गोड कूजन कोकिळा करे कानी मधुरव प्रीत पालवी फुलली मनी नवे प्रेमार्णव षड ऋतूंचे बहर घोस प्रेमाचे फुलवी सुगंध रातराणीचा प्रेमबन बहरवी अपूर्व नि अश्विनीचे नाते रुजले प्रेमाचे मने एकरुप झाली शतजन्म संगतीचे साथ दोघांची जीवनी घट्ट अतूट रहावी आशिर्वच उभयतां जन सकल वर्षती हर्ष उसळे मनात मनी उभय जन्मदा शुक्लेंदूच्या चंद्रापरि प्रीत वर्धिष्णुची सदा आशीर्वाद नि शुभेच्छा सदा बरसो जीवनी प्रीत फुलोरा फुलावा नित्य उभयतां मनी ............................ सौ. मनीषा आवेकर पुणे फोन 9763706200