प्रीत फुलली नदी किनारी
प्रीत फुलली नदी किनारी
थांब ना जरा नदीच्या काठी
वाट बघत तू माझ्यासाठी
ऐक जरा ते धुंद तराणे
खळखळणारे नदीचे गाणे
येतो मी ही घेवून तुला
जास्वंदाच्या रेशमी फुला
गोड गुलाबी सोनपापडी
वेळ लागतो वाट वाकडी
मारू झप्प्या मारू गप्पा
करू प्रीतिच्या गप्पाटप्पा

