STORYMIRROR

Bharati Sawant

Tragedy

3  

Bharati Sawant

Tragedy

परी

परी

1 min
284

आवडली ईश्वराला ही कळी

नेले तिला आपल्याच स्वर्गी

कसं जगायचं मागच्यांनी

गेली सोडून ती तिच्या मार्गी


रडत भेकत माय सदा ती

जगतेय बघ मयतावाणी

तू सोडून जाताना गं परी

बोलली ती नको जाऊ राणी


जगणेही नरक बनलेय आता

मायचे बाळे हे तुझ्याविना

सांगून थकलेत बघ सारेजण

राहतेय ती अन्नपाण्याविना


घेऊन दुसरा जन्म मुली तू

येशील का तिच्याच गं पोटी

जीवात जीव येईल तिच्या

होतील बघ साऱ्यांच्याच भेटी


का रूसली ही कळी मजवर

विचारते ती प्रश्न हा साऱ्यांना

काय द्यावे उत्तर तिला आम्ही

देवा नेतो घरी अशाच पऱ्यांना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy