परी
परी
परी काय असेल,
तुझ्याहून वेगळी,
कल्पना का करावी,
तू असता सामोरी.
रंभा काय असेल,
तुझ्या सारखी,
तू असता सामोरी,
रंभा का आठवावी.
अप्सरा आहेत म्हणे,
स्वर्गात सा-या,
तुझ्याविना त्या,
नाहीत वेगळ्या.
शब्द अजुन,
असतील मधूर किती
पहाता शब्दकोश,
आधिच तू बोलली.
हवा बघ कशी,
माथ्यावर आली,
पदर उडवित तुझा,
निघून गेली.
बागेत सारी बघ,
फूले गोजिरी,
तुझ्यामुळे,अजुन ती,
बघ किती सजली.
उंच उंच आकाशी,
पक्षी बघ गेला,
विहार उंच हवेत,
त्यांनी बघ केला.
किती धन असावे,
किती श्रीमंती,
तुझ्या सम कोठे ते,
हिरे माणिक मोती.
चल चल, बघ तो,
ढग बघ आला,
तुला पाहुनी कोसळील,
तो मोतीधारा.

