प्रेयसीच जणु माझी
प्रेयसीच जणु माझी
हृदयाला जे अमान्य झाले त्यानेच
डोक्यातल्या विचारांना स्फूर्ती मिळाली,
म्हणूनच तुझी ही सोबत
मला आयुष्यभरासाठी लाभली...
लाभलेल्या सोबतीने तुझ्या हृदयाला
रुचेल असं सर्व काही केलं,
कारण माझे नवखं प्रेमच मी तुझ्यात पाहिलं...
हृदयाच्या गाभाऱ्यात जाऊन स्वत:लाच जेव्हा झाकळले
तेव्हा माझे जगच जणु मी तुझ्यात पाहिले,
प्रेमळ सोबतीने तुझ्या चांगलं, वाईट सर्वकाही स्वीकारले...
सर्वकाही स्विकारताना एकांतही थोडासा नशिबी आला...
त्याच एकांतात वावरत असताना
सुचलीस मजला तु लिहिता लिहिता,
अक्षरांचे शब्द होऊन लेखणीच्या सोबतीने
उतरलीस तु कोऱ्या कागदावर;
विचारांच्या जडणघडणीत अवतरणारी
प्रेयसीच जणू माझी तू "कविता"....

