प्रेरणादायी सावित्रीबाई फुले
प्रेरणादायी सावित्रीबाई फुले
क्रांती ज्योत, पेटविली,
इथे, सावित्रीबाईंनी !
दाखविली, शिक्षणाची,
वाट, विद्येची जननी !!१!!
मात, करूनी विरोधां,
शाळा, स्त्रियांना खोलल्या!
पाया, तो स्त्रीशिक्षणाचा,
अडचणी, दुर केल्या !!२!!
स्त्रिया, त्याकाळी लाचार,
रस्ता, होता खडतर !
नशिबात, पुजलेला,
कायमचा, अंध:कार !!३!!
फुले, दांपत्य महान,
शिक्षणाची, कुंजी दिली!
विलायती, भाषेचीही,
चव, ज्ञानाई चाखली !!४!!
कर्मकांड, संपवुनी,
अंधश्रद्धा, नाकारली !
सत्यधर्म, पाळताना,
जोतिबांना, साथ दिली !!५!!
रोष, धर्म मार्तंडांचा,
अंगावरी, ओढविला !
प्लेग, रूग्णांच्या सेवेत,
प्राणत्याग, त्यांनी केला !!६!!
ज्ञान, दिलेस स्त्रियांना,
मुढ, मती घालविली !
कसे फेडू, आम्ही पांग,
थोर, तुझे उपकार !!७!!
जन्मदिनी, सारे करी,
दिन, बालिका साजरा!
कर्तृत्वांसी, वंदुनीया,
आज, तुम्हांसी मुजरा !!८!!