प्रेरणा
प्रेरणा
अंथरला हिरवागार गालीचा
तरुवेली पहुडल्या आनंदात
उतरल्या तारका उषःकाळी
तृण चमकती रवी किरणांत
अंथरला हिरवागार गालीचा
तरुवेली पहुडल्या आनंदात
उतरल्या तारका उषःकाळी
तृण चमकती रवी किरणांत
झाला न गारठा सहन त्यांना
तारकांनी त्य्गगले गगनाला
येऊन बिलगल्या त्या सार्या
प्रिय त्यांची माता अवनीला
रजनीकांत मनी थरथरला
पाही तो वाकुन धरणीकडे
सोडून गेल्या सार्या ललना
तृणातृणावर दवबिंदुचे सडे
लपेटून हिरवेगार गालीचे
मऊ मुलायम मखमालीचे
हिवाळ्याची रात्र नकोशी
रविकिरण सकाळ हवीशी
घेत प्रेरणा त्या सुर्यासम
पुढे जातो आभा फाकत
असो हिवाळा वा उन्हाळा
आम्ही सारे जातो धावत
झाला न गारठा सहन त्यांना
तारकांनी त्यागले गगनाला
येऊन बिलगल्या त्या सार्या
प्रिय त्यांची माता अवनीला
रजनीकांत मनी थरथरला
पाही तो वाकुन धरणीकडे
सोडून गेल्या सार्या ललना
तृणातृणावर दवबिंदुचे सडे
लपेटून हिरवेगार गालीचे
मऊ मुलायम मखमालीचे
हिवाळ्याची रात्र नकोशी
रविकिरण सकाळ हवीशी
घेत प्रेरणा त्या सुर्यासम
पुढे जातो आभा फाकत
असो हिवाळा वा उन्हाळा
आम्ही सारे जातो धावत
