Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Romance Others

3  

Chandan Pawar

Romance Others

प्रेमस्पर्श

प्रेमस्पर्श

1 min
209


नयन नयनांशी नेहमी

खूप काही सांगतात;

काही न बोलता फक्त

तुझा प्रेमस्पर्श मागतात.


माझ्या मनाच्या राज्यात

जादू फक्त तुझीच चालते;

तुझ्या प्रेमस्पर्शाच्या जाणिवेने

माझे वेडे मन मोहरते.


तुझा मखमली प्रेमस्पर्श माझ्या

वेडावलेल्या मनास दिलासा आहे;

त्या स्पर्शातून केलेला तू    

प्रेमाचा तो खुलासा आहे.


तुझ्या त्या प्रेम स्पर्शाला

मंद असा सुवास आहे;

त्या मनभावन प्रेमस्पर्शात

अडकलेला माझा श्वास आहे.


प्रेमस्पर्श होतांना तुझा

काळानेही थांबून जावं;

प्रेममिठीत तुझ्या कुशीत

आयुष्य हे संपून जावं.


एकदा तो तुझा सहवास

तोच स्पर्श भरभरून हवा;

उन्हांत तापलेल्या मातीवर

जसा मृगसरींचा शिडकावा नवा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance