STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

4  

Vasudha Naik

Romance

प्रेमलावणी...

प्रेमलावणी...

1 min
521

कसं सांगू सख्या साजणा,

मला दागिन्यानं मढवा

गड जेजुरी, या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा॥धृ॥


सात जन्माचे आपण साथी

सदोदीत ठेवू एकमेकांचे हात हाती

प्रितीच्या झुल्यावर मला झुलवा

गड जेजुरी, या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा॥१॥


मखमली पलंग हा सजवला

मदभरी स्पर्श तुझा देह हा थरथरला

हळूच घ्या बाहुपाशात, प्रेमानं भिजवा 

गड जेजुरी, या खंडेरायाचं

दर्शन मला घडवा॥२॥


कमनीय बांधा माझा काया चमकदार

पाठीवर रूळतोय चोळीचा दोर 

छानदार

पाहुनी माझ्या या ललना साजणा नयनी हो साठवा

गड जेजुरी, खंडेरायाचं

दर्शन मला घडवा॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance