प्रेमधुंद...
प्रेमधुंद...
मोहात आहे प्रीत स्नेहाची
प्रेमाचा आगळावेगळा फेरा
स्वभाव घट्ट भावभावनांचा
बेधुंद जीवाचा आनंदी डेरा
हास्यात सगळं सुख
प्रेमधुंदीचा कडवा सूर
सामंजस्याचा एक क्षण
पाहुनी लालबुंद मुख
नाजूक कळीचा स्पर्श
देहभान विसावतो त्यात
कलहाचा मिश्किल भाव
स्पंदनांचा नाद देहात

