STORYMIRROR

Shamal Kamat

Tragedy

4  

Shamal Kamat

Tragedy

प्रेमबंध

प्रेमबंध

1 min
410

त्याचे माझे जुळले होते

हे सर्वांना कळले होते

एक दिवशी त्याला आला माझा राग

म्हणाला लगेच माझी माफी माग

मी माझ्या तत्त्वाला चिकटले होते

काही केल्या मागे हटले नव्हते

नको, नको म्हणताना व्हायचेे तेच झाले

प्रेमाचे धागे जुळण्याआधीच ऊसवले गेले

जरी झाला होता माझा प्रेमभंग

तरी त्याच्याच विचारात असायची दंग 

त्याचे माझे बिनसले होते हे मात्र कोणाला कळले नव्हते

एक दिवशी तो मला अचानक रस्त्यात भेटला

मनाने होता खूप उदास, चेहरा दिसत होता भकास

जणू काही हिंदी सिनेमातील देवदास

मी काही बोलणार इतक्यात तोच मला म्हणाला

त्या दिवशी खरे तर माझेच चुकले होते

झाले गेले विसरुन जाऊ 

 पूर्वीसारखे आपण एकमेकांना भेटत राहू

त्याचे माझे पुन्हा जुळले होते

ऊसवलेले प्रेमाचे धागे जरा जास्तच घट्ट विणले गेले होते

कारण त्याचे माझे कायमचे प्रेमसंबंध जुळले होते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy