प्रेमातल्या पाखरा
प्रेमातल्या पाखरा
प्रेमातल्या पाखरा पाखरा...
होऊनी धुंद
उड जरा उड जरा
कोणी हा खेळ खेळला
तुझ्याशी हा डाव मांडला
कळेना रे काही
काय झाले हे तुला
सावरूनी तू मनाला
घे ध्यास
जीव लाव पणाला
चोचींने कापुनिया टाक
तो पिंजरा
होऊन येशील तू माझ्याशी
सांग या माझ्या मनाशी
संपून जातील सर्व अंतरे
घेऊ भरारी

