STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

4  

Yashodhan Waghmare

Others

नामांकन

नामांकन

1 min
34

वेळ लागतो मित्रा, थोडे थांब तु जरा

असा नको होऊन जाऊ कावरा बावरा

लिह पुन्हा पुन्हा, शिक चुकांपासुन

पारितोषिके काय राहणार दुर तुला वाचून

नामांकन मिळते कामाला, पन मत मागावे लागतील

वॉट्स अँप आणि फेसबुकवर काही बोट दाबावे लागतील

जुडून रहा हि संगत खुप सुंदर बघ

नाहीतर ह्या जगात सर्वानी ओढलीय पैशांची रघ

कलेची किम्मत पैशामध्ये मोजता येत नाही

यश नाही मिळाले म्हणून कलाकार मरत नाही

ही स्पर्धा नाही मुळीच ,फक्त ओळख स्वतःची करायचे

हसत हसतच रडायचे आणि रडत रडतच हसायचे 



Rate this content
Log in